तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता लिरिक्स - Tuch Sukh Karta Tuch Dukh Harta Lyrics
तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता लिरिक्स
अवघ्या दिनाच्या नाथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे,
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे,
चरणी ठेवितो माथा || धृ ||
पहा झाले पुरे एक वर्ष,
पहा झाले पुरे एक वर्ष,
होतो वर्चाने एकदा हर्ष
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श,
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श,
घ्यावा संसाराचा परामर्श
पुऱ्या वर्षाची साऱ्या दुखाची,
पुऱ्या वर्षाची साऱ्या दुखाची,
वाचावी कशी हि गाथा || १ ||
पहा आली कशी आज वेळ,
कसा खर्चाचा बसावा मेळ,
गुळ फुटणे खोबर नि केळ,
गुळ फुटणे खोबर नि केळ,
साऱ्या प्रसादाची केली भेळ,
करी भक्षण आणि रक्षण,
करी भक्षण आणि रक्षण,
तूच पिता तूच माता… || २ ||
नाव काढू नको तांदळाचे,
नाव काढू नको तांदळाचे,
केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख साऱ्या घराचे,
हाल ओळख साऱ्या घराचे,
दिन येतील का रे सुखाचे
सेवा जाणून गोड मानून
सेवा जाणून गोड मानून
घ्यावा आशीर्वाद आता….. || ३ ||
तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता भजन लिरिक्स मराठी
Tuch Sukh Karta Tuch Dukh Harta Bhajan Lyrics Marathi
Ganesh Bhajan Lyrics In MarathiSong: Bappa Moraya Re
Singer- Prahlad Shinde
Lyricist: Harendra Jadav
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें